सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 15:21 IST2020-08-29T15:20:57+5:302020-08-29T15:21:47+5:30
Sushant Singh Rajput Case : त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे.

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
सुशांत सिंग राजपूतआत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात नोडल अधिकारी असलेले पोलीस उपायुक्त अभिनव त्रिमुखे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाची कोरोना चाचणी होणार आहे.
त्यामुळे इतक्या जलद गतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाचा वेग मंदावणार तर नाही अशी शंका उपस्थित झालीय. याआधी बिहारचे पोलीस अधिकारी मुंबईत सुशांत प्रकरणी तपासासाठी आले असताना त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले होते. आज सीबीआयचा सुशांत प्रकरणी तपासाचा नववा दिवस आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?