बापरे! बाजारात कोरोनाची बोगस किटही आली; सीबीआयने राज्य सरकारला केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:50 PM2020-05-05T20:50:18+5:302020-05-05T20:52:14+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट टेस्टिंग किटच्या विक्रीबद्दल माहिती देण्यात आली होती.

Corona's bogus kit also came on the market; CBI warns state government pda | बापरे! बाजारात कोरोनाची बोगस किटही आली; सीबीआयने राज्य सरकारला केले सावध

बापरे! बाजारात कोरोनाची बोगस किटही आली; सीबीआयने राज्य सरकारला केले सावध

Next
ठळक मुद्देइंटरपोलने बनावट किट गुप्तपणे आंतरराष्ट्रीय बाजारात आणल्याबद्दल 194 सदस्य देशांना सतर्क केले आहे.इंटरपोलशी संबंधित बाबींबाबत सीबीआयशी संपर्क साधण्यासाठी आयएलओ हा प्रत्येक राज्य पोलिस दलाचा प्रतिनियुक्त अधिकारी असतो.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) देशातील राज्यस्तरीय पोलिसांना बनावट कोविड -१९ चाचणी किटबद्दल सतर्क केले आहे. या संदर्भात सीबीआयकडून इंटरपोलला सूचना देण्यात आली आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट टेस्टिंग किटच्या विक्रीबद्दल माहिती देण्यात आली होती.

सीबीआयने म्हटले आहे की, इंटरपोलने बनावट किट गुप्तपणे आंतरराष्ट्रीय बाजारात आणल्याबद्दल 194 सदस्य देशांना सतर्क केले आहे. सीबीआय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना (इंटरपोल) यांच्या समन्वयाने कारवाईत गुंतली आहे आणि सर्व इंटरपोल संपर्क अधिकारी (आयएलओ) यांना त्यांच्या संबंधित पोलिसांना याबाबत सतर्क करण्यास सांगितले. इंटरपोलशी संबंधित बाबींबाबत सीबीआयशी संपर्क साधण्यासाठी आयएलओ हा प्रत्येक राज्य पोलिस दलाचा प्रतिनियुक्त अधिकारी असतो.

“इंटरपोल कम्युनिकेशन्समध्ये कोणत्याही भारतीय कंपनीचा किंवा पुरवठादाराचा उल्लेख नाही,” असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी आणखी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला, कारण अशी माहिती देशातील पोलीस दलाच्या अखत्यारीत येणाऱ्या समाजकंटकांना सतर्क करू शकते.  कोविड -१९ चाचणी किट आयात करण्यासाठी भारत जास्त अवलंबून आहे. ऑनलाईन विक्री आणि बनावट औषधांची वैद्यकीय पुरवठा, रुग्णालयांना लक्ष्य करणाऱ्यांवर, वैद्यकीय पुरवठ्यासंबंधीची आर्थिक फसवणूक आणि बरेच काही यासह कोरोना व्हायरस साथीच्या रोगानंतर इंटरपोलने बर्‍याच आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
 

Web Title: Corona's bogus kit also came on the market; CBI warns state government pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.