Coronavirus : २०० जण पोहचले नमाजासाठी, पोलिसांनी अटकाव करताच केली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:42 PM2020-04-18T22:42:56+5:302020-04-18T22:46:22+5:30
Coronavirus : काही लोकांनी दगडफेक केली ज्यामध्ये सहा पोलिस जखमी झाले.
उत्तर काश्मीरमध्ये काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नमाज पठणासाठी गेले. त्याला पोलिसांनी नकार दिला. त्या लोकांनी पोलिसांवरदगडफेक सुरू केली. या दरम्यान सहा पोलिस जखमी झाले.
शुक्रवारी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सुंबल भागातील गानिस्टानमधील एका मशिदीत 200 हून अधिक लोक एकत्र आले. माहिती मिळताच पोलिस पथक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना दिसताच लोकांनी पळण्यास सुरवात केली. दरम्यान, काही लोकांनी दगडफेक केली ज्यामध्ये सहा पोलिस जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचे उल्लंघन करत 200 लोक नमाज पठण करण्यास पोहोचले. दगडफेक करणार्यांवर कारवाई केली जाईल. श्रीनगर महानगरपालिकेच्या सोनवार येथील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी इमामसह 20 जणांना अटक केली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 328 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्याचवेळी, कोरोना-संक्रमित (सोपोर) बारामुल्ला येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा शुक्रवारी राज्यात मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील हा पाचवा मृत्यू आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये 14 नवीन कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे. हे सर्व जण संक्रमित काश्मीर विभागातील आहेत. दरम्यान, संक्रमित झालेल्यांपैकी चार जणांना सीडी हॉस्पिटल जम्मू येथून सोडण्यात आले आणि त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजते.