Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:38 PM2020-05-18T16:38:41+5:302020-05-18T16:41:47+5:30

Coronavirus : राज्य पोलीस दलातील २९१ लढवय्या पोलिसांची ही कहाणी आहे.

Coronavirus: 291 police has fight to Corona, return home safe and sound pda | Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टर, नर्सच्याबरोबर लढत असताना या खाकी वर्दीवाल्यानाही या विषाणूची लागण झाली.मात्र त्याला न घाबरता धैर्याने मुकाबला केला.योग्य औषधोपचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या भयंकर किटाणूला त्यांनी परतवून लावले आहे.

मुंबई - राज्यातील कोरोनाचे महासंकट परतविण्यासाठी डॉक्टर, नर्सच्याबरोबर लढत असताना या खाकी वर्दीवाल्यानाही या विषाणूची लागण झाली.मात्र त्याला न घाबरता धैर्याने मुकाबला केला.थोड्या दिवसांच्या उपचारानंतर त्याच्यावर यशस्वी मात देत ते घरी परतले आहेत.


राज्य पोलीस दलातील २९१ लढवय्या पोलिसांची ही कहाणी आहे. योग्य औषधोपचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या भयंकर किटाणूला त्यांनी परतवून लावले आहे. त्यांच्याप्रमाणेच  त्याचे आणखी काही सहकारीही लवकरच बरे होऊन घरी परतणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांमध्ये ३४ अधिकारी आणि २५७ अंमलदाराचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांशजण मुंबई पोलीस दलातील आहेत. 

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना त्याचा संसर्ग पोलिसांनाही मोठया प्रमाणात होत आहे.आतापर्यत एका अधिकाऱ्यासह अकराजणाचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर पोलीस दलातील विविध घटकात कार्यरत असलेल्या तब्बल १२७५ जणांना त्याची लागण झाली आहे.त्यामध्ये १३१ अधिकारी आणि ११४२ अंमलदाराचा समावेश आहे.त्यांना ते कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये त्यापैकी ३४ अधिकारी आणि २९१ अंमलदार योग्य उपचारामुळे कोविड-१० पासून पूर्णपणे बरे झाले आहेत.त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक औषधे देऊन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला ९७१ जण उपचार घेत आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती सुधारत असून काहींचा उपचारानंतरचा पहिला  अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र आणखी दोन टप्यात चाचणी घेतली जाणार असून त्यामध्ये तसाच अहवाल आल्यास तेही  कोरोनापासून  मुक्त झाल्याचे जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांनाही टप्याटप्याने घरी सोडण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

 

नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 


'त्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करा'
आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी बंदोबस्तात जुंपलेल्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या उपचाराबाबत अजूनही समस्या आहेत. रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. विविध कारणे सांगत एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे, तेथून तिसरीकडे रुग्णाची पाठवणी केली जात असल्याची परिस्थिती आहे, एखाद्या पोलीस उपायुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या  अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच रुग्णालयांचे प्रशासन नमते घेऊन रुग्णाला अडमिट करून घेते,मात्र प्रत्येकवेळी अंमलदाराना वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होत नाहीत. अशा प्रकारामुळेच शाहूनगर पोलीस ठाण्यातील तरुण अधिकाऱ्याचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.त्यामुळे अडमिट करण्यास मुद्दामहून टाळाटाळ करणाऱ्या अशा रुग्णालयाच्या  प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त मागणी पोलीस वर्तुळातून होत आहे.

Web Title: Coronavirus: 291 police has fight to Corona, return home safe and sound pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.