Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:23 PM2020-05-22T17:23:24+5:302020-05-22T17:24:28+5:30
Coronavirus : पोलीस ठाण्यातील पोलिसांना क्वारंटाईन केले असून सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टातील मॅजिस्ट्रेट देखील कोरोनाच्या संकटात सापडले आहेत.
अजमेर - राजस्थानातील अजमेर येथे दरगाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 3 पैकी एका आरोपीला कोरोनाची बाधा झाली आहे. पोलिसांनी इतर आरोपींचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहे. ज्या मुलीवर बलात्कार झाला होता ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलिसांना क्वारंटाईन केले असून सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टातील मॅजिस्ट्रेट देखील कोरोनाच्या संकटात सापडले आहेत.
नवी दिल्ली येथे राहणारी अल्पवयीन मुलगी अजमेरच्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी आली होती. लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ती दर्ग्यात प्रार्थनेसाठी आली होती. असगर अली नावाच्या एका रिक्षाचालकाने तिला आमीष दाखवून त्याच्या घरी नेले आणि त्याने रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अंदरकोट भागातील दुसऱ्या घरात नेलं. तिथे त्याचे आणखी दोन मित्र होते. हे दोघेही जण बिहारचे रहिवासी आहेत. त्यांची नावे मोहम्मद रफीक आणि हबीबुल्ला अशी आहेत. असगर आणि त्याच्या मित्रांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. लॉकडाऊन घोषित झाल्याने संचारबंदी आणि जमावबंदी लागू झाली याचा फायदा उचलत या तिघांनी 2 महिने या मुलीवर बलात्कार केला. नंतर या मुलीने कशीबशी या तिघांपासून सुटका करून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले. या मुलीची वैद्यकीय तसापणी केली असता ती गरोदर असल्याचं उघडकीस आले आहे. तीनही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी तीनही आरोपींची कोरोनाची चाचणी केली होती. त्यात एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इतर दोन आरोपींचे अहवाल येणं बाकी आहे.
गर्भवती पीडित आणि मॅजिस्ट्रेट देखील धोक्यात
सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका आहे. असे म्हटले जात आहे की, पीडित तरुणीला अलग ठेवण्यात आले आहे, परंतु अद्याप तिचा कोरोनासाठी नमुने घेण्यात आलेला नाहीत. इतकेच नव्हे तर पिडीतेचे मॅजिस्ट्रेट ज्यांनी कलम 164 अन्वये जबाब घेतला. ते मॅजिस्ट्रेट व कोर्टाचे इतर कर्मचार्यांनाही संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू
विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न
धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं