Coronavirus : मरकजला गेलेल्या १६ परदेशी तबलिगींसह विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:27 PM2020-04-21T13:27:33+5:302020-04-21T13:30:36+5:30

Coronavirus : या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Coronavirus: allahabad university professor 30 arrested including 16 foreigners tabligi was involved in jamaat markaz | Coronavirus : मरकजला गेलेल्या १६ परदेशी तबलिगींसह विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक

Coronavirus : मरकजला गेलेल्या १६ परदेशी तबलिगींसह विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे31 मार्च रोजी शाहगंजमधील काटजू रोडजवळ अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखाना येथे सात इंडोनेशियन नागरिकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती.करेलीच्या हेरा मशिदीत हे सापडले होते. या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही मरकजहून आलेले तबलिगी अद्यापही राज्यातील अनेक भागात लपून बसले आहेत आणि ते आवाहन करून देखील आपली माहिती देत नाहीत. सोमवारी प्रयागराजमध्ये तबलिगी जमातीचे लोक लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी उशिरा रात्री धाड टाकून 30 जणांना अटक केली.


अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आणि 16 परदेशी जमातींसह एकूण 30 जणांचा समावेश आहे. परदेशी लोकांना परदेशी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली, तर अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या एका प्राध्यापकास गुप्तपणे शहरात त्यांना आश्रय दिल्याबद्दल आणि (साथीचा रोग) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी 31 मार्च रोजी शाहगंजमधील काटजू रोडजवळ अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखाना येथे सात इंडोनेशियन नागरिकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व जण निजामुद्दीन मरकज, दिल्ली येथे आयोजित तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे थायलंडमधील 9 नागरिकांसह एकूण 11 जमाती सापडले होते. करेलीच्या हेरा मशिदीत हे सापडले होते. या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

काही दिवसांनंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की, शिवकुटीतील रसुलाबाद येथे राहणारे अलाहाबाद विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील एक प्राध्यापकही दिल्ली येथे आयोजित तबलिगी जमातच्या जलसामध्ये सामील झाले आणि गुपचूप शहरात राहत आहे. यानंतर, त्या प्राध्यापकास कुटुंबासमवेत अलग ठेवण्यात आला. त्याचे चार सहकारी जे परदेशी जमातींसह दिल्लीहून परत आले आणि करेलीची हेरा मस्जिद आणि शाहगंजमधील अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखानाचे इतर 9 जणांना अलग ठेवण्यात आले.

Web Title: Coronavirus: allahabad university professor 30 arrested including 16 foreigners tabligi was involved in jamaat markaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.