Coronavirus : मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे आणखी एक बळी, सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 01:48 PM2020-05-16T13:48:59+5:302020-05-16T13:51:06+5:30
Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही देखील कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात सातवा बळी गेला.
मुंबई - मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आज आणखी एका ३४ वर्षीय पोलिसाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही देखील कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात सातवा बळी गेला.
शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे कोरोनामुळे आज पहाटे निधन झाले आहे. शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात १३ मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकालाही कोरोनाची लागण
कोकण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री १० वाजता त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा सहावा बळी
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला
Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड