coronavirus : अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी, गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 10:57 PM2020-04-11T22:57:24+5:302020-04-11T23:02:21+5:30
Coronavirus : अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करणार
कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर अनेक गरजूंना मदत करण्यासाठी अनेक हात मदतीला सरसावले. मात्र, काहींनी मदत करतानाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. अशांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न पदार्थ आणि जेवण वाटणाऱ्यांनी जर त्याचा फोटो काढला तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.
Selfie & photography to be banned during the distribution of food items in Ajmer. Any violation of social distancing norms may result in action under section 188 of the Indian Penal Code (IPC): Ajmer District Collector #Rajasthan#CoronaLockdown
— ANI (@ANI) April 10, 2020
अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी दिली.