Coronavirus : कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या कॉल सेंटरने ठाण्यात थाटला कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:39 AM2020-03-21T06:39:42+5:302020-03-21T06:39:56+5:30

ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Coronavirus: A call center Start Work at Thane | Coronavirus : कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या कॉल सेंटरने ठाण्यात थाटला कारभार

Coronavirus : कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या कॉल सेंटरने ठाण्यात थाटला कारभार

Next

ठाणे : कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शासनाने ते बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नवी मुंबईतील त्या कॉल सेंटरच्या मालकाने ते बंद न करता, त्यातील ४०० पेक्षा अधिक कर्मचारी ठाण्यात आणून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्यातील ढोकाळी येथे ज्या इमारतीमध्ये या ४०० कर्मचाऱ्यांना आणले होते, तेथे त्यांना बंदिस्त करून त्यांची तपासणी केली. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तपासणी केल्याशिवाय एकही कर्मचाºयाला या इमारतीच्या बाहेर जाऊ दिलेले नाही.
ऐरोली येथील कॉल सेंटरच्या एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानंतर, या कंपनीने ऐरोली येथील सेंटर बंद करून येथील ४०० कर्मचाऱ्यांना ठाण्यातील ढोकाळी परिसरात शरदचंद्र पवार मिनी स्टेडियमच्या बाजूला इमारतीमध्ये स्थलांतरित केले. हे समजताच जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनाला अ‍ॅलर्ट केले. त्यानंतर, गुरुवारी रात्री ११.३०च्या दरम्यान स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी धाव घेऊन पुन्हा नवी मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर, पालिकेचे आरोग्य पथक व पोलिसांनी तेथे जाऊन ४०० कर्मचाºयांना त्याच ठिकाणी बंदिस्त केले. त्यानंतर, त्यांची त्याच ठिकाणी तपासणी केली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अद्याप गुन्हा दाखल नाही
कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला. नवी मुंबईच्या ज्या कंपनीमधून हे कर्मचारी ठाण्यात आले होते, त्यांची तपासणी केली असून हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह असल्याचे ते म्हणाले. यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Coronavirus: A call center Start Work at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.