CoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:50 PM2020-03-31T21:50:27+5:302020-03-31T21:54:32+5:30
CoronaVirus : या आरोपीने सदरची माहिती जनगणना आदीसाठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांना जमवल्याने तणाव निर्माण झाला होता.
मीरारोड - मीरारोडमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने महापालिकेने परिसरातील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन तपासणी सुरु केली असताना पालिका कर्मचारायांना इमारतीच्या आवारात प्रवेश न देणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाविरोधात नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीने सदरची माहिती जनगणना आदीसाठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांना जमवल्याने तणाव निर्माण झाला होता.
कानुगो इस्टेटमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने महापालिकेने सदर वसाहत व परिसरातील इमारतीमध्ये राहणाराया रहिवाशांची तपासणी, कोरोना सृदश लक्षण असल्याची पडताळणी व माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. कारण कोरोनाचा संसर्ग शहरात पसरु नये म्हणुन १ किमी परिसरात निर्जतुकीकरण करण्यासह तपासणी महत्वाची असल्याने पालिकेने युध्दपातळीवर वैद्यकिय कर्मचारी व आशा वर्कर यांना तैनात केले आहे. शिवाय सोबत पोलीस देखील दिलेले आहेत.
आज मंगळवारी पालिकेचे पथक पोलीसांसह पूजा नगर मधील मेडतिया हेरीटेज या इमारतीत तपासणी गेले असता सदर सोसायटीचा सचिव जफर जमाल खान (५५) याने गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्याने ही माहिती जनगणना नोंदणी आदी साठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांमध्ये भिती निर्माण केली. लोकांना गोळा करुन तणाव निर्माण केला. त्यामुळे सदर इमारतीतील रहिवाशांची तपासणी व माहिती घेता आली नाही.
याची नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी गांभीर्याने दखल घेत सचिवाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन घेण्याचे निर्देश दिले. त्या नुसार वैद्यकिय पथकासोबत असलेले पोलीस नाईक बाबाजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जफर खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.