Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:59 PM2020-04-17T17:59:26+5:302020-04-17T18:01:07+5:30
Coronavirus : बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी भाजपाचेखासदार सुभाष सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. खासदारांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबद्दल अफवा पसरविल्याचा आरोप आहे. बांकुडा येथील खासदाराविरोधात तक्रार आल्यानंतर बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते जयदीप चट्टोपाध्याय यांनी ही तक्रार दाखल केली आहे. भाजपा खासदाराने सोशल मीडियावर सांगितले की, अधिकाऱ्यांकडून दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची महिती अनावधानाने पोस्ट करण्यात आली. त्यांनी सांगितले होते की, मृतकांचा कोरोना विषाणूमुळे हे मृत्यू झाला होता.
टीएमसी नेते म्हणाले, 'खासदार स्वत: डॉक्टर आहेत. दुर्दैवाची बाब आहे की कोणताही अहवाल न पाहता कोविड -१९बाबत (साथीचा रोग) त्यांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला."चाचणीचा निकाल येण्यापूर्वी प्रशासनाने मृतदेहांचे अंत्यसंस्कार कसे केले?" असे प्रत्युत्तर देत भाजपा खासदार पलटवार केला. १२ एप्रिलला मध्यरात्री अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात दोन जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. काही लोकांचा असा दावा केला की त्या दोघांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता.