Coronavirus : अन्न वाटप करताना गर्दी जमवल्याने गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:26 PM2020-04-13T14:26:31+5:302020-04-13T14:30:55+5:30
Coronavirus : याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई - कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग परिसरातील कांती नगरात २०० ते २५० गरजूंना एकत्र जमवून अन्न वाटप केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
जोगेश्वरी येथे अटक आरोपितांनी रेडी फूड वाटप करताना 200 ते 250 लोक जमवून कोरोना या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन असताना सदरबाबत महाराष्ट्रात आदेश लागू असताना सदर आरोपितांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन कोविड-19 या आजाराचे संक्रमण होण्यास कारणीभूत असलेली धोकादायक कृती केली, म्हणून फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश शेका सावंत (54) यांनी दिलेल्या तक्रारनुसार भा. दं. वि. कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.