CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाला घाबरून क्लार्कने कार्यालयातच केली आत्महत्या; पत्नीसाठी लिहिली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:01 PM2020-04-02T13:01:44+5:302020-04-02T13:04:52+5:30
CoronaVirus : सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, कोरोना विषाणूमुळे तो घाबरून गेला आहे आणि आपला जीव देत आहे.
मेरठ - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या कोरोनाच्या भीतीपोटी ऊस विकास परिषदेच्या (शेरमऊ) लिपिका (क्लार्क) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, कोरोना विषाणूमुळे तो घाबरून गेला आहे आणि आपला जीव देत आहे.
ऊस विकास परिषद शेरमऊ यांचे नकुड येथील बायपास स्थित सत्संग भवनाजवळ एक कार्यालय आहे. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत कार्यालय बंद झाले नव्हते. शेजारी राहणारे जितेंद्रने आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ऑफिसमध्ये लिपिक असलेल्या आदेश सैनीचा मृतदेह लटकताना आढळून आला होता. मृत आदेश रामपूर मनिहाराण पोलिस ठाण्यातील शेरपूर गावचा होता. नकुड कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी केली.
कोतवाली प्रभारी सुशील सैनी यांनी सांगितले की, घटनास्थळावर एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कोरोनापासून खूप घाबरलो आहे आणि मानसिक ताणतणावात आहे, माझा जीव संपवत आहे, माझे सर्व पैसे माझ्या पत्नीला देण्यात यावे, कोतवाली प्रभारी म्हणाले की, प्राथमिक प्रकरण आत्महत्येचे आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून तपास सुरू केला आहे.