Coronavirus : बापरे! कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा महागात पडली, गुन्हा दाखल; 13 जण निघाले पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:40 PM2020-05-16T16:40:11+5:302020-05-16T16:50:48+5:30
Coronavirus : याप्रकरणी कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली. शनिवारी शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या 103 झाली.
उल्हासनगर : डॉक्टरचा आदेश धुडकावून सार्वजनिकरित्या संशयीत कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा काढल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी दोन दिवसात 13 जणांना कोरोना संसर्ग झाला असून इतरांचा स्वाब अहवाल येणे बाकी असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मलवळकर यांनी दिली. उल्हासनगर कॅम्प नं 3, खन्ना कंपाऊंड येथील 50 वर्षीय कोरोना बाधिताच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या, पैकी एकून 13 जणांना कोरोनाची लागण झाली. तर इतरांचे अहवाल येणे बाकी आहे.
मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगूनही संशयित कोरोना बाधीत मृतदेहावर शासन नियमानुसार अंत्यसंस्कार करण्या ऐवजी सार्वजनिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेर महापालिका आयुक्तांच्या आदेशनुसार पालिका सहायक आयुक्त भगवान कुमावत यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघा जनावर गुन्हा दाखल केली. शुक्रवारी 9 तर शनिवारी 3 असे एकूण 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले असून इतर जनाचे स्वाब अहवाल येणे बाकी असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मालवलकर यानी दिली. शहरातील दुसऱ्या घटनेत एका खाजगी रुग्णालयात कोरोना संशयीत एका महिलेचा मृत्यू सोमवारी झाला. रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाच्या ताब्यात मुतदेह देताना बांधलेला मुतदेह उघडू नका. तो कोरोना संसर्गित असल्याच्या सूचना दिल्या. मात्र कुटुंबाने सर्व आदेश धुडकावून सार्वजनिकरित्या अंत्ययात्रा काढली.
याप्रकरणी कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली. शनिवारी शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या 103 झाली. त्यापैकी 5 जणाचा मुत्यु झाला असून 15 जण कोरोना मुक्त झाले. तर 83 जनावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरु आहे. शनिवारी खन्ना कंपाऊंड 3, मराठा सेक्शन आदर्श नगर 1, चोपडा कोर्ट परिसर 5 व संभाजीचौक 2 असे 11 नवीन रुग्ण मिळाले आहेत.
कोकण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री १० वाजता त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
coronavirus: मुंबई पोलीस दलात कोरोनाचा सहावा बळी
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला
Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड