CoronaVirus कोरोनाने राज्यापुढे आणखी एक मोठे संकट वाढून ठेवले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:43 AM2020-04-10T07:43:57+5:302020-04-10T07:44:36+5:30
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले.
मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत़ हे संकट कायम असताना डिजिटल सेवेकडे वाढलेला कल, राज्य शासनाकड़ून मिळणाऱ्या विविध सवलती, उपाययोजनांचा फायदा घेत सायबर भामटे फसवणूक करत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले.
त्यासोबतच प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सेवा किंंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६० जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, आदी आमिषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत.
हे ठग बँक अधिकारी / कर्मचारी बोलत असल्याचे सांगून त्यांची बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती घेत फसवणूक करत असल्याचे मुंबई सायबर पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. तसेच या ठगांनी खातेदारांना संदेश धाडून त्याद्वारे ंल्ल८ीि२‘, द४्रू‘ र४स्रस्रङ्म१३, ळीें श््री६ी१, अल्ल१िङ्म्र िसारखे स्क्रीन शेअरिंंग अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाइल व संगणकाचा अनधिकृत तांबा घेत फसवणूक करत असल्याचे प्रमाण वाढत आहेत.
व्हॉट्सअॅपवरून अफवांना जोर...
गेल्या पाच दिवसांमध्ये समाजमाध्यमांवरून कोरोना प्रादुर्भावासाठी ठरावीक एका समाजाला जबाबदार धरण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सायबर पोलिसांनी एकूण २० गुन्हे नोंदवले. त्यापैकी १४ गुन्ह्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार समोर आला. उर्वरित सहा गुन्हे कोरोनाबाबतच्या अफवा होत्या. अशात आतापर्यंत सायबर महाराष्ट्रकडून राज्यभरात एकूण १३५ गुन्हे नोंदवण्यात आले.