Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:50 PM2020-05-13T19:50:50+5:302020-05-13T19:53:23+5:30
Coronavirus : कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.
वैभव गायकर
पनवेल - तळोजा मध्यवर्ती कारागृहातून दोन दिवसात सुमारे 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्यात आला आहे . कोविडच्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल दिलेल्या या कायद्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेले व ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे. अशा कैद्याचा समावेश असल्याचे कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितले. आर्थर रॉड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 185 पेक्षा जास्त कैद्यांना कोविडची लागण झाल्यानंतर राज्य शासनाने इतर कारागृहात कोविड बाबत विविध उपाययोजना राबविल्या आहेत.राज्यातील 8 कारागृह पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा देखील समावेश आहे. कारागृह प्रशासनाने यापूर्वीच कोविडबाबत सावध भूमिका घेत कारागृहात विविध उपाययोजना राबविल्या आहेत.
Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण
हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस
Video : ... म्हणून दुचाकीस्वाराला ट्राफिक पोलिसाने लावला रस्ता स्वच्छ करायला
तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2124 एवढी आहे. 2700 च्या आसपास कैदी सध्याच्या घडीला याठिकाणी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 50 कैद्यांना पॅरोल देण्यात आले आहे.
कोविडच्या धर्तीवर 50 कैद्यांना कारागृहातून इमर्जन्सी पॅरोल देण्यात आले आहे.ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे.तसेच ज्यांना सात वर्षापर्यंत सात वर्षापुढे शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे.कारागृहात कोविडचा प्रादुर्भाव टाकण्यासाठी आमच्यामार्फत विविध उपययोजना राबविण्यात आल्या आहेत. - कौस्तुभ कुर्लेकर (अधीक्षक ,तळोजा मध्यवर्ती कारागृह)