Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:37 PM2021-06-04T16:37:46+5:302021-06-04T16:38:33+5:30

Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Coronavirus: Fake company, counterfeit pills, playing with the lives of corona patients in Usmanabad district of Maharashtra | Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ 

Coronavirus: बनावट कंपनी, नकली गोळ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सुरू होता कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळ 

Next

उस्मानाबाद - कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली असली तरी देशातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचा कहर अद्याप थांबलेला नाही. काही ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याचदरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापरली जाणाऱ्या फेविमेक्सचे नकली औषध मिळाले आहे. या प्रकारामुळे प्रशासन हादरले आहे.  (Fake company, counterfeit pills, playing with the lives of corona patients in Usmanabad district of Maharashtra)

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एफडीएने एक व्यापक मोहीम चालवली होती. त्यामधून नकली औषधे जप्त करण्यात आली होती. त्याचेच काही धागेदोरे उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मुख्य वितरक शिवसृष्टी सर्गेमेड, मेडिटेब वर्ल्डवाइड आणि निवरव ट्रेनिंगकडे या नकली औषधांचा स्टॉक मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यांमध्ये या नकली गोळ्या विकल्या गेल्या.  

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार येथे कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टॉर्चचा वापर गोळ्या तयार करण्यासाठी करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या गोळ्यांची निर्मिती करणारी कंपनी कुठे अस्तित्वाच नाही आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या तयार करण्यासाठी विशिष्ट्य सामुग्रीची गरज असते. मात्र या गोळ्यांची निर्मिती करण्यासाठी कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टॉर्चचा वापर होत होता. 

ज्या नकली गोळ्या सापडल्या त्यावर कंपनीचा पत्ता मॅक्स रिलिफ हेल्थकेअर सोलन, हिमाचल प्रदेश असा देण्यात आला होता. मात्र तपास केला असता तिथे अशी कुठलीही कंपनी नसल्याचे समोर आले. आता फेविमॅक्स गोळ्यांची उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनाथ एंटरप्रायझेसकडून उमरग्यामध्ये ३०० आणि उस्मानाबादमध्ये २०० स्ट्रिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत ६५ हजार एवढी आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार यामध्ये दुकानदारांची काहीही चूक नाही आङे. कारण त्यांना पुरवठाच चुकीचा होत होता.  

Web Title: Coronavirus: Fake company, counterfeit pills, playing with the lives of corona patients in Usmanabad district of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.