Coronavirus : पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:13 PM2020-05-14T16:13:52+5:302020-05-14T16:15:50+5:30

Coronavirus : दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला होता. या खंबीर घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी आरोपींना अटक केली होती त्यातील आठ आरोपी हे अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत होते. 

Coronavirus: Four accused in police custody infected with coronavirus | Coronavirus : पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोरोनाची लागण

Coronavirus : पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देअंबरनाथ पश्चिम भागातील शास्त्रीनगर परिसरात आठ दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. अंबरनाथ पोलिस ठाण्यात पॉझिटिव्ह सापडलेला पोलीस कर्मचारी उपचार घेऊन घरी परतलेला असतानाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या स्वरूपात सापडल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येणार आहे.

आंबरनाथ - अंबरनाथ शास्त्रीनगर भागात झालेल्या दोन गटातील हाणामारीत अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना कोरोनाची लागण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंबरनाथ पोलीस स्टेशन हे कोरोणाचे हॉटस्पॉट झाल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील शास्त्रीनगर परिसरात आठ दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला होता. या खंबीर घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी आरोपींना अटक केली होती त्यातील आठ आरोपी हे अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत होते. 

 

याच अंबरनाथ पोलिस ठाण्यात एक पोलिस कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याठिकाणी कार्यरत असलेल्या आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्क झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना टेस्ट करण्यात आले होते. मात्र त्यातील एकही कर्मचारी करुणा पॉझिटिव्ह आढळला नाही. यादरम्यान अटकेत असलेले आठ आरोपींपैकी चार आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात हे चारही आरोपी कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या चारही आरोपींना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चारा आरोपींची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्यात पॉझिटिव्ह सापडलेला पोलीस कर्मचारी उपचार घेऊन घरी परतलेला असतानाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या स्वरूपात सापडल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येणार आहे.

आणखी बातम्या वाचा...

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

 

लज्जास्पद! पतीने केला पत्नीचा सौदा, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तिला सोपवले परपुरुषांकडे

 

Web Title: Coronavirus: Four accused in police custody infected with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.