coronavirus: महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:28 AM2020-07-10T02:28:58+5:302020-07-10T02:29:25+5:30

दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला होता.

coronavirus: fraud of municipal secondary engineer | coronavirus: महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक

coronavirus: महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक

Next

मुंबई: पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरळी परिसरात राहण्यास असलेले ४० वर्षीय तक्रारदार अभियंता सी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानुसार त्यांनी बुधवारी संबंधित क्रमांकावर कॉल करून चौकशी केली. त्यांना नव्याने पेटीएम डाऊनलोड करून, क्विक सपोर्ट नावाची लिंक उघडण्यास सांगून त्यात १० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. याच दरम्यान त्यांच्या खात्यातून ५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. यात, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: coronavirus: fraud of municipal secondary engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.