Coronavirus : लॉकडाऊनमध्ये देखील तो सांभाळतोय तळीरामांची मने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:41 PM2020-04-16T17:41:04+5:302020-04-16T17:57:34+5:30
Coronavirus : मनाई आदेश भंग करून विदेशी दारू बाळगण्याऱ्यास अटक, गिरीज गावात वसई गुन्हे शाखेची कारवाई
आशिष राणे
वसई - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे,तसेच जिल्ह्यात देखील मनाई आदेश लागू करण्यात आला आहे,तरीही बिनधास्तपणे वसई पश्चिमेच्या गिरीज गावातील आरोपी ऑल्विन जॉन डिसिल्वा याच्याकडे विदेशी मद्याच्या लाखोंच्या व्हिस्कीच्या बॉटल्स वसई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ने हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गिरीज येथून आरोपीच्या घरातुन रु.1 लाख 90 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर वसई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वसई पोलिसांनी लोकमत'ला दिली
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीज येथील या आरोपींकडे प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा माल आढळून आला असून यामध्ये बॉम्बे सफायर ब्लेंडेड जीन, युवन विलियम्स ब्लेंडेड व्हिस्की, वोडका जॉनी वॉकर व्हिस्की, ब्रांड मास्टर वोडका ,वाईट विस्की ,बकार्डी रम ,व्हेलगा नोबल वोडका ,इंटेन्स वोडका, स्काय इन्फ्युजन वोडका ,स्मिर्नोफ वोडका, जॉनी वॉकर ,ब्लॅक लेबल, रिझल्ट स्कॉच व्हिस्की जॉनी वॉकर प्लॅटिनम ,गोल्ड लेबल व्हिस्की अशा विविध विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बॉटल्स मिळून एकूण रु.1 लाख 90 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या आरोपीविरुद्ध कलम 188, 269 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 (ब) दारूबंदी अधिनियम 65 (फ)भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर वसई युनिट पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून या आठवडाभरातील ही दुसरी घटना असून पहिल्या घटनेत वसई कोळीवाड्यात 60 हजारांची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते.