Coronavirus : व्हॉट्स अॅपवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:38 PM2020-04-27T13:38:41+5:302020-04-27T13:40:30+5:30
Coronavirus : व्हॉट्स अॅपच्या स्टेटसवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह मेसेज ठेवला होता.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. यात कोरोनाबाधित रुग्णाची ओळख गुप्त ठेवली जात असताना एका त्याच्या व्हॉट्स अॅपच्या स्टेटसवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह मेसेज ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
Coronavirus : दुःखद! मुंबई पोलीस दलातील पोलिसाची कोरोनाशी झुंज संपली
प्रेमाला नकार दिल्याने प्रियकाराकडून प्रेयसीची हत्या
ऑनलाइन फसवणूक झालेल्या कंपनीला परत मिळाले ६५ लाख
बंगळुरू येथील अनिल राठोड या तरुणाने हे कृत्य केले आहे. अनिलने एका २४ वर्षीय कोरोनाबाधित तरुणीचा फोटो आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसवर ठेवला होता. इतक्यावरच न थांबता त्याने वाईट बातमी एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली असा मेसेज ठेवला होता. त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली. तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा फोटो वायरल करून तिला केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिल राठोड या तरुणाला अटक केली आहे.