CoronaVirus लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:55 PM2020-04-30T15:55:58+5:302020-04-30T15:56:22+5:30

नोएडातील याकूबपूर गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

CoronaVirus Husband stranded in village due to lockdown; wife committed suicide hrb | CoronaVirus लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

CoronaVirus लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

Next

नोएडा : लॉकडाऊनमध्ये कामाधंद्यानिमित्त परगावी गेलेले लोक ठिकठिकाणी अडकले आहेत. मात्र, त्यांच्या काळजीने घरच्यांना घोर लागला आहे. नोएडामध्ये अशीच पतीची वाट पाहणाऱ्या महिलेने बेचैन होऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


नोएडातील याकूबपूर गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या महिलेचा पती त्याच्या मूळ गावी गेला होता. मात्र, लॉकडाऊन झाल्याने तिथेच अडकून बसला होता. यामुळे महिला तणावामध्ये होती. ओमप्रकाश हा त्याची पत्नी शीतल आणि मेव्हनी चंदरसोबत भाड्याच्या घरामध्ये राहत होता. 


ओमप्रकाश त्याच्या गावी कामानिमित्त गेला होता. मात्र, केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्याने त्याचे माघारी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. बुधवारी रात्री शीतलने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. ओमप्रकाशच्या मेव्हनीने पोलिसांना याची माहिती दिली. 
चौकशीवेळी पोलिसांना मेव्हनीने सांगितले की, ओमप्रकाश काही दिवसांपूर्वी गावी गेले होते, ते परत आले नाहीत. यामुळे शीतल तणावात होती. चंदरने हे कारण सांगितले असले तरीही पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

CoronaVirus Lockdown जेवढा लॉकडाऊन वाढणार तेवढ्या जास्त नोकऱ्या जाणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

Web Title: CoronaVirus Husband stranded in village due to lockdown; wife committed suicide hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.