Coronavirus : लॉकडाऊनमध्ये इफ्तार पार्टी ठेवणं पडलं महागात, १९ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 23:15 IST2020-05-02T23:12:09+5:302020-05-02T23:15:55+5:30
Coronavirus : रमजान महिन्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये इफ्तार पार्टी ठेवणं पडलं महागात, १९ जणांवर गुन्हा दाखल
देशात कोरोना विषाणूचा फैलाव होताना दिसून येत आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे. लॉकडाऊनमुले लोकांना एकत्र न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, रमजान महिन्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना सामाजिक अंतर पाळले पाहिजे आणि घरातच राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर रमजान महिन्यात कुटुंबासमवेत लोकांच्या घरी इफ्तार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील मोहल्ला चौथ्या पट्टी येथे जामा मशिदीसमोर पप्पू नावाच्या व्यक्तीने रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या माहितीवरुन जेवार पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आयोजक पप्पू आणि मौसम नावाच्या व्यक्तीला अटक केली.
Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना
लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत
मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासह त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जात आहे.