Coronavirus Lockdown : राज्यात मद्यविक्रीप्रकरणी अडीच हजार गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:48 PM2020-04-13T22:48:21+5:302020-04-13T22:55:34+5:30

Coronavirus Lockdown : एका दिवसात 34जणाना अटक

Coronavirus Lockdown: 2 and Half a thousand crimes of alcohol selling case during lockdown in the state pda | Coronavirus Lockdown : राज्यात मद्यविक्रीप्रकरणी अडीच हजार गुन्हे

Coronavirus Lockdown : राज्यात मद्यविक्रीप्रकरणी अडीच हजार गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे . नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 तर व्हाट्स अ‍ॅप क्रमांक 8422001133 आहे.

मुंबई : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद  आहेत. रविवारी  राज्यात 64 गुन्हे नोंदविण्यात आले असून 34 जणांना अटक केली  आली आहे. त्याच्याकडून एकूण 11 वाहने जप्त करण्यात आली असून 18 लाख रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत पूर्ण टाळेबंदी कालावधीमध्ये राज्यात 2 हजार 447 गुन्हे नोंदविण्यात आले असून 971 जणांना अटक करण्यात आली आहे.

 126 वाहने जप्त करण्यात आली असून 5 कोटी  89 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे . नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333  तर व्हाट्स अ‍ॅप क्रमांक 8422001133 आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  सदर क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus Lockdown: 2 and Half a thousand crimes of alcohol selling case during lockdown in the state pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.