Coronavirus Lockdown : टीव्ही अँकरविरोधात गुन्हा दाखल, रिसॉर्टवर गर्दी जमवून थाटला लग्न सोहळा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:25 PM2020-04-21T19:25:21+5:302020-04-21T19:28:39+5:30

Coronavirus Lockdown : लॉकडाऊनचे उल्लंघन करत अँकरने त्याच्या रिसॉर्टमध्ये पाहुण्यांना बोलावून लग्न केले असल्याचा आरोप आहे.

Coronavirus Lockdown : Case registered against TV anchor who gathered cowd for marriage at resort pda | Coronavirus Lockdown : टीव्ही अँकरविरोधात गुन्हा दाखल, रिसॉर्टवर गर्दी जमवून थाटला लग्न सोहळा  

Coronavirus Lockdown : टीव्ही अँकरविरोधात गुन्हा दाखल, रिसॉर्टवर गर्दी जमवून थाटला लग्न सोहळा  

Next
ठळक मुद्देकर्नाटकमधील कन्नड टीव्ही अँकरने लॉकडाऊनचे उल्लंघनाबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांचा मुलगा निखिलच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

बंगळुरू -  देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणाऱ्या या कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी सर्व लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे, परंतु अनेक ठिकाणी लॉकडाउन उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सरकारच्या निर्देशानुसार एका ठिकाणी 4 हून अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. परंतु कर्नाटकमधील कन्नड टीव्ही अँकरने लॉकडाऊनचे उल्लंघनाबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करत अँकरने त्याच्या रिसॉर्टमध्ये पाहुण्यांना बोलावून लग्न केले असल्याचा आरोप आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अँकरने हे लग्न आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. अशा वेळी लॉकडाऊन उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा त्रास वाढला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण आपापल्या घरी कैद झाले आहेत. यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांचा मुलगा निखिलच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे लग्नही लॉकडाऊनदरम्यान झाले. या लग्नात त्यांचे नातेवाईक सामील होते. यानंतर सोशल मीडियावरही या लग्नावर टीका झाली होती. लॉकडाऊनने लग्नाला व्हीव्हीआयपी सूट देण्याबाबत चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी हे स्पष्ट केले की या लग्नात कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन उल्लंघन झाले नाही.
 

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन आहे. सर्व लोक 3 मे पर्यंत आपापल्या घरात कैदेत आहेत. अद्याप या संसर्गावर कोणताही इलाज नाही. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा ६०० च्या वर गेला आहे. त्याचवेळी, संसर्ग झालेल्यांची संख्या १९,००० पेक्षा जास्त झाली आहे. दररोज हा आकडा वाढतच आहे. सध्या देश कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे.

Web Title: Coronavirus Lockdown : Case registered against TV anchor who gathered cowd for marriage at resort pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.