CoronaVirus Lockdown :भाजीपाल्यासाठी बाहेर जाण्यावरून वाद झाला; मोठ्या भावाने तवाच डोक्यात घातला
By प्रदीप तत्सत | Published: March 26, 2020 08:08 PM2020-03-26T20:08:27+5:302020-03-26T20:12:13+5:30
याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर जाण्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. कांदिवलीतील पोयसर येथील पशुपतीनाथ दुबे चाळीत ही धक्कादायक घटना घडली. गुढीपाडव्यादिवशी सकाळी १० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशुपतीनाथ दुबे चाळीतील दुर्गेश लक्ष्मी ठाकूर (२१) या धाकड्या भावाने २८ वर्षीय भावाला आणि वहिनीला बाजारात जाण्यास मनाई केली होती. तरी देखील भाऊ आणि वाहिनी देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाजीपाला घेण्यास घराबाहेर पडले. त्यावरून धाकड्या आणि थोरल्या भावात कडाक्याचे भांडण झाले आणि या भांडणाचे पर्यवसन हत्येत झाले. मोठ्या भावाने लोखंडी तंवा लहान भावाच्या दुर्गेशच्या डोक्यात घेतला. यात दुर्गेशचा मृत्यू झाला असून याबाबत त्याचा मित्र रामप्रसाद मुखिया (३०) याने समता नगर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार समता नगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.