Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 17:20 IST2020-05-01T17:13:27+5:302020-05-01T17:20:26+5:30
Coronavirus Lockdown : एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पोलिसांना गावप्रमुखांकडून याची माहिती मिळाली.

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी
लखीमपूर - आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील एका गावात धार्मिक सभा रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवरदगडफेक झाल्याने चार सुरक्षा कर्मचार्यांसह जवळपास पाच जण जखमी झाले. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी रात्री घडली. दक्खिन पंडोवा गावात एका मशिदीत लोकांना नमाज अदा केल्याची माहिती मिळाल्यानंतर नाओबिचा पोलिस चौकी प्रभारी विश्वजित नाथ यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस पथक दाखल झाले होते. एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पोलिसांना गावप्रमुखांकडून याची माहिती मिळाली.
Coronavirus : व्हॉट्स अॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून
Coronavirus : व्हॉट्स अॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या पथकास इमामसह 12 जण तेथे पोचल्यावर मशिदीच्या आत सापडले. त्यांनी इमाम आणि इतरांना एकत्र न होण्याची विनंती केली आणि त्यांना सोशल डिस्टंसिंगच्या असलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. या पथकाने आवारात प्रवेश करण्यापूर्वी मशिदीच्या शेजारी चालू असलेला एक छोटासा बाजार बंद केला. पथक मशिदीचा परिसर सोडण्याच्या तयारीत असताना जोरदार दगडफेक सुरू झाली. या दरम्यान चार पोलीस व गावप्रमुख जखमी झाले.
पोलिसांचे वाहनाचेही नुकसान झाले आणि विंडस्क्रीन व साइड विंडो तुटल्या. जखमींमध्ये नाथ, आसाम पोलिस शिपाई करुणा बुजारबरुआ , सीआयएसएफचे कर्मचारी भूमिहार नरजारी आणि सरोज यादव आणि गाव प्रमुख अब्दुल जलील फरशी हे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याच्या दुखापती गंभीर नाहीत.