CoronaVirus Lockdown: 'ती' पोलिसांसमोर तलवार घेऊनच उभी ठाकली; म्हणाली 'हिंमत असेल तर हटवून दाखवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 06:11 PM2020-03-26T18:11:41+5:302020-03-26T18:15:08+5:30
CoronaVirus Lockdown : चक्क दुर्गा देवीचे रूप धारण करून महिलेने तलवारीने एसडीएम व सीओवर हल्ला केला. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही.
उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मेहड़ापुरवांमधील दुर्वा देवी पूजनाजवळ गर्दी हटवण्यासाठी गेलेले पोलीस आणि प्रशासनाचे लोक अडचणीत आले. चक्क दुर्गा देवीचे रूप धारण करून महिलेने तलवारीने एसडीएम व सीओवर हल्ला केला. सुदैवाने, कोणालाही दुखापत झाली नाही.
नंतर, पोलीस दलाने दुर्गादेवीसह १२ जणांना अटक केली. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविण्यात आले होते. परिषद शिक्षक शिवप्रसाद यादव यांची पत्नी सुभद्रा देवी या कोतवालीच्या मेहड़ापुरवांमध्ये अनेक वर्षांपासून अंधश्रद्धेचा धंदा करते. तिच्याकडे महिला आणि पुरुष दुरवरुन येतात. तेथे त्यांना आजारातून बरं केल्याचा दावा केला जात आहे. बर्याच महिला आणि मुली यांना एकाच खोलीत बंद केले जाते. बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला संबंधित ठिकाणी प्रचंड गर्दी असल्याची माहिती मिळाली. एसडीएम दिनेश मिश्रा आणि सीओ निष्ठा उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पथक तेथे पोचले. तेथे उपस्थित सुमारे १०० महिला व पुरुषांनी विरोध करण्यास सुरवात केली.
दुर्गादेवीचे रूप धारण करणार्या सुभद्रा देवीने तलवारीने या लोकांवर हल्ला केला. मात्र, सुदैवाने काही विपरीत घडले नाही. नंतर, पथकाने कडक कारवाई करत १२ जणांना ताब्यात घेतले. या कोतवाली पोलिसांनी एसआय अंजनी कुमार यांच्या तक्रारीवरून मेहड़ापुरवांची सुभद्रा देवी, तिचा नवरा शिव प्रसाद यादव, मुलगा अवनीश यादव, सून मानवी यादव, गावातील रहिवासी उषा देवी, रिया राजभर राहणारे - अंडिला, मईल, पूजा भारती राहणाऱ्या - छितौनी, हाटा, कुशीनगर, नेहा यादव राहणाऱ्या - रामपुर खुर्द, रामपुर कारखाना, जोखू चौहान राहणारे - बढ़या बुजुर्ग, कोतवाली, सुभाष सिंह राहणारे - डिघवा, रामपुर कारखाना, देवा यादव रहाणारे - विशुनपुर भरत राय, रामपुर कारखाना और विकास कुमार राहणारे - धतुरा खास, गौरीबाजार यांच्याविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा पसरविणे, आर्म्स एक्ट, सेवेन सीएलए अॅक्ट और पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर सर्वांना तुरूंगात पाठविण्यात आले. यासंदर्भात सीओ सिटी निष्ठा उपाध्याय यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
शिक्षक निलंबित
बैतालपूर भागातील माजी माध्यमिक विद्यालय धतूरा खास येथील सहायक शिक्षक शिवप्रसाद यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. बीएसए प्रकाश नारायण श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितले की, निलंबित शिक्षक पुरवामेहड़ा येथील निवासस्थानी लोकं आजाराला पळविण्यासाठी अंधश्रद्धा बळी पडताना आढळले. प्रशासनाने त्यास जाब विचारल्यास त्यांना झिडकारलं . कोरोनाला संसर्ग होण्यापासून वाचविण्यासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्रीही जनतेचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अनावश्यक जमाव गोळा केल्याप्रकरणी आणि आजाराच्या प्रतिबंधास पाठिंबा न दिल्याबद्दल तातडीने त्यांना निलंबित केले जाते.