CoronaVirus Lockdown : रथोत्सवात पोलिसांवर दगडफेक, २२ जणांना अटक तर १०० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 11:51 PM2020-03-30T23:51:18+5:302020-03-30T23:56:44+5:30
CoronaVirus Lockdown : पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणाऱ्या २२ आरोपींना अटक करून पोलिसांनी येथील कोर्टासमोर हजर केले
अक्कलकोट : वागदरी ता.अक्कलकोट येथे रथोत्सवासाठी गर्दी करू न देणाऱ्या पोलिसांवरदगडफेक करून गंभीर जखमी करणाऱ्या २२ आरोपींना अटक करून पोलिसांनी येथील कोर्टासमोर हजर केले होते. त्या सर्वांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, रविवार दि.२९ मार्च रोजी ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा निमित्त सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रथोत्सव करू नका. सध्या कोरोना मुळे संचारबंदी आहे. असे सांगत असताना उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी व त्यांचे सहा पोलीस कर्मचारी यांच्यावर दगडफेक करून गंभीर जखमी केले होते. यामुळे एकूण ४० जणावर शासकीय कामात अडथळा,दगडफेक करणे,शिवीगाळ, दमदाटी, गंभीर जखमी, यासह डझनभर कलमांनव्ये उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झालेले आरोपी असे:-सिद्धाराम भरमदे, परमेश्वर भरमदे, महादेव भरमदे, शरण भरमदे, सुनील भरमदे, मल्लिनाथ खांडेकर, नागेश पटणे, दत्ता हुग्गे, सुभाष यमाजी, शरणू भैरामडगी, सुनील गाडीवडार, धुळप्पा नंदर्गी, मल्लिनाथ ठोंबरे, महेश सुतार, कल्याणी पोमाजी, शिवशंकर चितली, नागराज मड्डे, दीपक चितली, अंबादास शिरगण, सिद्धाराम शिरगण, शिवराज चितली, महादेव खांडेकर, शारणप्पा भरमदे, श्रीशैल भरमदे, तिपण्णा स्वामी, विजयकुमार निंबाळे, सुनील भरमदे, प्रभय्या मठपती, नागनाथ सुतार, मल्लिनाथ शिरगण, परमेश्वर माळी, शिवरत्न चितली, हणमंत मंजुळकर, सिद्रामप्पा बटगेरी, रवींद्र घोळसगाव, मलप्पा निरोळी, शिवपुत्र धड्डे, शैलेश चितली, सिद्धाराम भरमदे, प्रभाकर भैरामडगी, शिवपुत्र शिरगण, शिराज चितली, यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यापैकी शिवशंकर, नागराज, दीपक, अंबादास, म्हाळप्पा, बसवणप्पा, सिद्धाराम, शिवराज,महादेव, शारणप्पा, श्रीशैल, तिपण्णा, विजयकुमार, सुनील, प्रभय्या, नागराज, मल्लिनाथ, परमेश्वर, शिवरत्न, हणमंत, सिद्धाराम भरमदे, प्रभाकर असे २३ जणांना अटक करून येथील कोर्ट गवळी एस. एन. यांच्यासमोर उभे केले होते. त्या सर्व आरोपिना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत जखमी झालेले उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सपोनि व्ही.के. नाळे हे करीत आहेत. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस वागदरी येथे तळ ठोकून आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथे अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन गावातून ना बाहेर ना आत प्रवेश केलेले नाही. तसेच गावात एकही पुरुष मनुष्य गावात फिरकले नाही. बरेच जण शेतशिवारात दिवस काढलेले आहेत.