Coronavirus : कोरोना पसरवणाऱ्या मलेशियन महिलेला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:57 PM2020-04-25T22:57:54+5:302020-04-25T22:57:54+5:30

Coronavirus : राज्यात संक्रमित लोकांची संख्या ६३ झाली आहे.

Coronavirus: A Malaysian woman who spreads coronavirus was arrested pda | Coronavirus : कोरोना पसरवणाऱ्या मलेशियन महिलेला ठोकल्या बेड्या

Coronavirus : कोरोना पसरवणाऱ्या मलेशियन महिलेला ठोकल्या बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी रांचीच्या रिम्समध्ये एकूण 78 नमुन्यांची तपासणी करण्यात आलीरुग्ण हिंदपीढी येथील आहेत तर १ कांटाटोली येथील रहिवासी आहेत.

रांची -  झारखंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. शनिवारी पुन्हा एकदा राजधानी रांचीमध्ये चार कोरोना संसर्ग झालेल्यांची ओळख पटली. चारही नवीन प्रकरणे रांचीतील हिंदपीढी आणि कांटा टोली भागातील आहेत. शनिवारी रांचीच्या रिम्समध्ये एकूण 78 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 4 पॉझिटिव्ह व 74 निगेटिव्ह आढळले. रिम्सचे अधीक्षक डॉ. डीके सिंह यांनी चार पॉझिटिव्ह रुग्णांच्या तपासणीची माहिती दिली असून राज्यात संक्रमित लोकांची संख्या ६३ झाली आहे. ही सर्व प्रकरणे रांचीची आहेत. यापैकी रुग्ण हिंदपीढी येथील आहेत तर १ कांटाटोली येथील रहिवासी आहेत. कोरोना पसरवणाऱ्या मलेशियन महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 



झारखंडमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णही आढळले. यातील दोघे रांचीतील हिंदपीढीतील आहेत, तर एक देवघर येथील आहे. यासह झारखंडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 60 झाली आहे. त्यातील तिघांचा मृत्यू, तर नऊजण बरे झाले आहेत. कोरोना मधून बरे झाल्यानंतर आणखी एका रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. झारखंडच्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये गुडगाव येथे नुकताच एकाच उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्यामध्ये बरियातू येथील निवृत्त डीडीसीचा देखील समाविष्ट आहे.

 

Web Title: Coronavirus: A Malaysian woman who spreads coronavirus was arrested pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.