Coronavirus : मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर उगारला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:09 PM2020-04-18T18:09:14+5:302020-04-18T18:14:28+5:30

Coronavirus : याप्रकरणी यशमिन शेख आणि नवाजुद्दीन सोफिया यांना अटक केली असून अकबर शेख हा फरार झाला आहे.

Coronavirus : In Mankhurd hawkers assaulted police and municipal employees pda | Coronavirus : मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर उगारला हात

Coronavirus : मुजोर फेरीवाल्यांनी पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर उगारला हात

Next
ठळक मुद्देमानखुर्द येथील लल्लुभाई वसाहतीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका तसेच पोलिसांचे पथक गेले होते.संपूर्ण भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे.

मुंबई - मानखुर्दच्या येथील लल्लुभाई वसाहतीतील मुजोर फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी आणि पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण गांभीर्याने न घेता संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसत होते. यावर मानखुर्द  येथील लल्लुभाई वसाहतीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका तसेच पोलिसांचे पथक गेले होते. या पथकातील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच महिला पोलिसांनाच या मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केली. याप्रकरणी यशमिन शेख आणि नवाजुद्दीन सोफिया यांना अटक केली असून अकबर शेख हा फरार झाला आहे.


या चौघांविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच एकाचा शोध सुरू आहे. या मारहाणीत शीतल माने व देवयानी कुटे या महिला पोलीस जखमी झाल्या. तसेच, या फेरिवाल्या महिलांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मारहाण केली. एकीकडे करोनाशी लढाईत पोलीस आपले योगदान देत आहेत. तर अशा मुजोर फेरीवाल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचत आहे, पोलिसांवर हात उचलणाऱ्या या फेरीवाल्यांवर कोणाचा वरदहस्त आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. 

 

 

 

Web Title: Coronavirus : In Mankhurd hawkers assaulted police and municipal employees pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.