Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:32 PM2020-05-11T16:32:23+5:302020-05-11T16:38:49+5:30
Coronavirus : नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी पोलिसांना धीर देत मनोधैर्य वाढवले आहे.
मुंबई - कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस दल आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग हे आज रस्त्यावर उतरले. त्यांनी नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी पोलिसांना धीर देत मनोधैर्य वाढवले आहे.
अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी उत्तर मुंबईतील अनेक ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला. सिंग यांनी दहिसर चेक नाका जो मुंबई शहराचा एन्ट्री पॉईंट आहे तेथे देखील भेट दिली. मुंबईत कोरोनामुळे ४ पोलिसांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दलात भीतीचे सावट आहे. या सगळीकडे आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची पोलीस आयुक्त सिंग यांनी चौकशी करून त्यांना फिल्डवर असताना विशेष काळजी घेण्यास सांगितली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल बंधावण्याचे मोलाचं काम सिंग यांनी केले.
CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा
मुंबई - पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उपनगरातील नाकाबंदी ठिकाणी दिल्या भेटी, पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020