Video : Coronavirus : मुंबई पोलिसांनी २ हजार २०० रेमडेसिवीरचा इंजेक्शन्स केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:35 PM2021-04-20T17:35:53+5:302021-04-20T17:42:17+5:30

Coronavirus : मुंबई पोलिसांची अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी बारीक लक्ष असून त्याअनुषंगाने छापेमारी सुरु आहे. 

Coronavirus : Mumbai Police seizes 2,200 Remdesivir injections | Video : Coronavirus : मुंबई पोलिसांनी २ हजार २०० रेमडेसिवीरचा इंजेक्शन्स केली जप्त

Video : Coronavirus : मुंबई पोलिसांनी २ हजार २०० रेमडेसिवीरचा इंजेक्शन्स केली जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअंधेरी पूर्वेतील मरोळ येथील फार्मा कंपनीकडून २ हजार तर न्यू मरिन लाईन्स येथून २०० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईपोलिसांनी कोरोनाशी संबंधीत औषधांच्या काळ्या बाजारप्रकरणी कारवाई करत २ हजार २०० रेमडेसिवीरचा इंजेक्शन जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांनीअन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मदतीने अंधेरीतील मरोळ आणि न्यु मरीन लाईन्स येथे छापेमारी करून ही कारवाई केली आहे. अंधेरी पूर्वेतील मरोळ येथील फार्मा कंपनीकडून २ हजार तर न्यू मरिन लाईन्स येथून २०० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. 

करोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार अलीकडेच मालवणी पोलिसांनी उघडकीस आणला होता. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून यामध्ये डॉक्टर, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह (एमआर) यांचा समावेश होता. २० हजार रुपये दराने ही टोळी रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे उघड झाले असून, त्यांनी नेमकी किती इंजेक्शनची विक्री केली याचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांची अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी बारीक लक्ष असून त्याअनुषंगाने छापेमारी सुरु आहे. 

 

Web Title: Coronavirus : Mumbai Police seizes 2,200 Remdesivir injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.