Coronavirus : नमाजासाठी पुन्हा एकत्र जमलेल्यांनी पोलीस पथकाला केली मारहाण, मौलवीसह २३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:21 PM2020-04-24T23:21:29+5:302020-04-24T23:22:44+5:30

Coronavirus : जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशन भागातही नमाज थांबवल्यानंतर पोलिस पथकावर हल्ल्याची घटना उघडकीस आली.

Coronavirus :namazis gathered for friday prayers amid lockdown police arrested 23 along with maulvi pda | Coronavirus : नमाजासाठी पुन्हा एकत्र जमलेल्यांनी पोलीस पथकाला केली मारहाण, मौलवीसह २३ जणांना अटक

Coronavirus : नमाजासाठी पुन्हा एकत्र जमलेल्यांनी पोलीस पथकाला केली मारहाण, मौलवीसह २३ जणांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील बहराइचमधील बौंडी पोलिस स्टेशन परिसरातील मशिदीत नमाजसाठी जमाव जमला होता बौंडीमधील हवालदारांवर प्राणघातक हल्ला आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बहराइच - कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहून सरकार आणि धर्मगुरू सतत आवाहन करत आहेत की, नागरिकांनी घरातच राहावे आणि मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येऊ नये. परंतु उत्तर प्रदेशातील बहराइचमधील बौंडी पोलिस स्टेशन परिसरातील मशिदीत नमाजसाठी जमाव जमला होता, जेव्हा पोलिसांच्या पथकाने त्यांना नकार दिला तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशन भागातही नमाज थांबवल्यानंतर पोलिस पथकावर हल्ल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी एकूण 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बौंडीमधील हवालदारांवर प्राणघातक हल्ला आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय शुक्रवारी दुपारी तेलियनपुरवातील खैरिघाट पोलिस स्टेशन परिसरात लॉकडाऊनच्या वेळी सामूहिकरित्या मशिदीत येणार्‍या लोकांच्या पोलिसांशी हाणामारी झाली. नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर लाठी हल्ला करुन दगडफेक केली. त्यामुळे दोन निरीक्षकांसह सहा पोलिस जखमी झाले. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमींवर शिवपूर पीएचसी येथे उपचार करण्यात आले आहेत.

23 जणांना अटक करण्यात आली
बौंडीच्या डिहवाकलां गावात शुक्रवारी ग्रामस्थांनी नमाजींनी गावच्या मशिदीत नमाज वाचल्याचे सांगितले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची टीम मशिदीत जमली आणि त्यांनी नमाज पठणास मज्जाव केला. या प्रकरणी नमजींनी पोलीस शिपायावर हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी पोहोचले. 23 जणांना अटक करण्यात आली आहे.


गंभीर कलमांअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल
एसओ ब्रह्मानंदसिंग यांनी सांगितले की, मौलाना सईद, गुल्लाऊ, इरफान, सद्दाम, अन्वर अली, मोहम्मद अतीक, मोहम्मद सईद, जाकिर, ताज मोहम्मद, हजरदीन, ताहिर, नानकाऊ, लुकमान, नफीस, इसरत, जाकिर, बडलु , अलियार, सद्दीक, सुफियान, लल्लन, जाबीर अली, अली मोहम्मद यांना अटक केली आहे. आरोपीविरूद्ध लॉकडाउन उल्लंघन आणि प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Coronavirus :namazis gathered for friday prayers amid lockdown police arrested 23 along with maulvi pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.