Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 14:50 IST2020-07-25T14:49:14+5:302020-07-25T14:50:43+5:30
Coronavirus : महापालिका प्रशासनाने तातडीने या भागात कंटेनमेंट झोन लागू करत सर्व परिसर. लोखंडी पत्रे व जाळीने बंदिस्त केला होता. यास नागरिकांचा विरोध होता.

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
सांगली : शहरातील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी एकाच दिवसात पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या भागात कंटेनमेंट झोन करण्यात आला होता.मात्र शनिवारी सकाळी या भागातील नागरिकांनी संरक्षक यंत्रणा उध्वस्त करून टाकली. शुक्रवारी सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात एकाच दिवसात 25 रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने या भागात कंटेनमेंट झोन लागू करत सर्व परिसर. लोखंडी पत्रे व जाळीने बंदिस्त केला होता. यास नागरिकांचा विरोध होता.
रॅपिड टेस्टच्या निदानावर संताप व्यक्त करीत नागरिकांनी कंटेनमेंट घेऊन उध्वस्त केल्याचे समजतात विश्रामबाग पोलिस ठाण्याचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी या भागातील नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही असा झोन ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी नागरिकांशी चर्चा करून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सांगलीतील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात pic.twitter.com/JLDzX6Necn
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2020