Coronavirus : अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जा, मुंबई पोलिसांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 03:40 PM2020-04-06T15:40:26+5:302020-04-06T15:41:13+5:30
Coronavirus : मरकजमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी
मुंबई - दिल्लीतील मरकजहून आलेल्यांनी स्वतः पुढे यावे असे मुंंबई पोलिसाांनि आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलिग़ी जमात मरकजमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे जे मरकजहून आलेले जे कोणी आरोग्य तपासणीस सहकार्य करत नसतील त्यांना मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलीग़ी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी बृ.मुं.म.पा च्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 6, 2020
असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.#TakingOnCorona