Coronavirus : पोलीस बनला देवदूत! १० तास प्रवास करून कॅन्सरग्रस्तास दिली औषधं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:52 PM2020-04-18T21:52:22+5:302020-04-18T21:55:44+5:30
Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही लोकांना अन्न आणि औषधे मिळविण्यास समस्या येत आहेत.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काही लोकांना अन्न आणि औषधे मिळविण्यास समस्या येत आहेत. अशा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोरोना योद्धा सुद्धा गुंतले आहेत. हे योद्धे कठीण काळात लोकांसाठी देवदूत म्हणून बाहेर पडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना कर्नाटकात घडली आहे.
कॅन्सर रुग्णाला औषधांची नितांत गरज होती. कर्नाटकातील कॅन्सरच्या रुग्णाचे औषध संपले होते. त्यांना औषधाची नितांत आवश्यकता होती. अशा परिस्थितीत कर्नाटक पोलिसांचा एक सैनिक त्या व्यक्तीला ९६० किमी स्कुटी चालवून औषध आणून दिली. प्रत्येकजण या कोरोना योद्धाचे कौतुक करीत आहे. कर्नाटकचा धारवाड येथे राहणारा उमेश हा कॅन्सर रुग्ण आहे.
कॅन्सर रुग्णाला औषधाची नितांत आवश्यकता होती. औषधे फक्त बंगळुरूमध्येच सापडली. १० एप्रिल रोजी बंगळुरू पोलिसांचे 47 वर्षीय हेड कॉन्स्टेबल एस कुमारस्वामी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर उमेश यांच्याबाबत बातमी ऐकली. रविवारीपर्यंत हे औषध घ्यायचे होते, असे उमेश सांगत होता. पण लॉकडाऊनमुळे ते बंगळूरहून औषध घेऊ शकले नाहीत.
धारवाड येथे जाण्यासाठी एसीपीकडून परवानगी
हेड कॉन्सटेबल कुमारस्वामी यांनी रुग्णाला औषध पोचवण्याचा विचार केला आणि त्यांची ड्युटी संपल्यानंतर दुसर्याच दिवशी न्यूज चॅनेलच्या कार्यालयात पोचला. तेथून त्याने उमेशचा नंबर घेतला. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमधील डीएस रिसर्च सेंटरमधून औषधे घेतली आणि एसीपी अजय कुमार सिंग यांच्याकडे धारवाडला जाण्यासाठी परवानगी मागितली.
10 तास प्रवास
आयसीपीने त्यांना धारवाड येथे जाण्याची परवानगी दिली. शनिवारी पहाटे ते चार वाजता धारवाडहून निघाले आणि अडीच वाजता तेथे पोहोचले. त्यांनी फक्त पाणी आणि बिस्किटांच्या मदतीने १० तास प्रवास केला. कुमारस्वामी उमेशच्या घरी पोहोचला तेव्हा तो त्याला पाहून थक्क झाला.
फायर स्टेशनमध्ये रात्र घालवली
उमेशच्या घरी काही काळ राहिल्यानंतर कुमारस्वामी बंगळुरूला रवाना झाले. सलग १० तास स्कूटी चालविण्यास कंटाळलेला कुमारस्वामी रात्री १०.३० वाजता चित्रदुर्गाच्या अग्निशमन केंद्रात पोहोचला आणि तेथेच रात्री आराम केला. दुसर्या दिवशी सकाळी ५. ३० वाजता ते पुन्हा बंगळुरूला निघाले आणि सकाळी १०.३० वाजता पोहोचले.
मी फक्त आत्म्याचा आवाज ऐकला
कुमार स्वामी यांनी सांगितले की, त्यांचा धारवाडशी काही संबंध नाही, ते रामनगरातील रहिवासी आहे. ते पुढे म्हणाले, मी फक्त आत्म्याचा आवाज ऐकला आणि निघून गेलो. कुमारस्वामी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुमारस्वामी यांचा बंगळूरच्या सिटी कमिश्नर भास्कर राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.