Coronavirus : रेमडेसिवीरचा काळाबाजार! फार्मासिस्टला पोलिसांनी केली अटक; १३ हजार विकत होता इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 18:31 IST2021-04-20T18:30:18+5:302021-04-20T18:31:52+5:30
Coronavirus : Remdesivir's black marketing - आरोपीकडून रेमडेसिवीरची १८ इंजेक्शन्स जप्त केली आहेत.

Coronavirus : रेमडेसिवीरचा काळाबाजार! फार्मासिस्टला पोलिसांनी केली अटक; १३ हजार विकत होता इंजेक्शन
एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही झपाट्याने वाढत आहे. याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे लोक पकडले जात आहेत. या प्रकरणात, गुन्हे शाखेने हरियाणाच्या पंचकुला येथून फार्मासिस्टला रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्यापरकरणीअटक केली आहे. आरोपीकडून रेमडेसिवीरची १८ इंजेक्शन्स जप्त केली आहेत.
पंचकुलाचे डीसीपी मोहित हांडा यांनी सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजार करीत असताना एका फार्मासिस्टला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने फार्मासिस्टला पंचकुला सेक्टर-11 मधून अटक केली आहे. पकडलेल्या फार्मासिस्टचे नाव शिवकुमार असे आहे. शिवकुमार झज्जरचा रहिवासी असून नुकताच पंजाबमधील मुबारकपूर येथे शिफ्ट झाला.
अशा प्रकारे पकडले फार्मासिस्टला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी अमन कुमार व त्यांच्या गुन्हे शाखा सेक्टर -26 च्या पथकासह पंचकुला ड्रग्स कंट्रोल ऑफिसर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक फार्मासिस्ट बेकायदेशीरपणे कोरोना औषधे निश्चित किंमतीपेक्षा जास्त किंमतीवर विकत आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यास सांगितले.
आरोपी फार्मासिस्ट शिवकुमार यांनी फोनवर सांगितले की, एका इंजेक्शनची किंमत 13,000 रुपये होती. त्यानंतर गुन्हे शाखेचा बनावट ग्राहक सदस्य इंजेक्शन खरेदी करण्यासाठी गेला आणि त्याला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून आरोपीकडून रेमडेसिवीरची १८ इंजेक्शन्स जप्त केली आहेत.
फार्मासिस्टजवळ आवश्यक कागदपत्रे मिळाली नाहीत
जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शिवकुमारला खरेदी रेकॉर्ड, औषध विक्री परवाना यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले तेव्हा घटनास्थळावर कोणताही परवाना किंवा पावती दाखवू शकला नाही. त्यानंतर आरोपीविरुध्द आयपीसी कलम २०२० आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिल्लीहून दोघांना अटक
त्याचवेळी रेमडेसिवीरची काळाबाजार करणार्या दोन जणांना दिल्लीहून गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी मेडिकल स्टोअरचा मालकही आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये गोयल मेडिकोचा मालक बसंत गोयल (४१ आणि त्याच्यासोबत काम करणारा राम अवतार शर्मा (२७) यांचा समावेश आहे. राम अवतार 7 वर्ष गोयल मेडिको येथे कार्यरत होता. पोलिसांनी दोघांवर एफआयआर नोंदविला आहे.