Coronavirus : आठवण आली म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी त्याने केले लॉकडाऊनचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:09 PM2020-04-15T22:09:46+5:302020-04-15T22:12:40+5:30
Coronavirus : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याची ऑस्ट्रेलियामधील ही पहिली घटना आहे.
सिडनी - ऑस्ट्रेलियातील 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे तेथील सरकारने जोनथान नावाच्या या व्यक्तीला एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याची ऑस्ट्रेलियामधील ही पहिली घटना आहे.
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका महिन्यापूर्वी जोनथन डेव्हिडला पर्थमधील एका हॉटेलमधून अनिवार्य क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पर्थ मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी आरोपी जोनथान डेव्हिडने सांगितले की, “आधी मी खाण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले. काही तासांनंतर मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केले. कारण मला तिची खूप आठवण येत होती.
पोलिसांनी सांगितले की, तो अनेकदा हॉटेल कर्मचार्यांच्या नजरेतून यशस्वीरित्या पळून गेला, परंतु तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यासह, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 28 मार्च रोजी व्हिक्टोरियाच्या दक्षिणेकडील पर्थ येथे डेविडला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवले होते. मात्र, त्याने लॉकडाऊनचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांना संपूर्ण महिना तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड भरावा लागला.
सिडनीच्या पश्चिमेला एका गाडीत पिझ्झा खाणार्या डझनभर लोकांच्या जमावाविरूद्ध तक्रारी असून लॉकडाऊन कायद्याच्या उल्लंघनाबद्दल देशभरातील पोलिसांनी एक हजाराहून अधिक दंड ठोठावला आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे