Coronavirus : दुःखद! मुंबई पोलीस दलातील पोलिसाची कोरोनाशी झुंज संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 22:11 IST2020-04-25T22:08:15+5:302020-04-25T22:11:02+5:30
Coronavirus : वरळी येथील रहिवासी होता.

Coronavirus : दुःखद! मुंबई पोलीस दलातील पोलिसाची कोरोनाशी झुंज संपली
मुंबई - कोरोनाच्या लढाईत समर्थपणे सामील झालेले पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतानाच मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी येथील रहिवासी होता.
मुंबई - कोरोनामुळे पोलिसचा पहिला बळी, हवालदाराचा मृत्यूhttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) April 25, 2020
संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दिल्लीत आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) April 25, 2020