CoronaVirus : धक्कादायक! नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:19 PM2020-04-15T12:19:51+5:302020-04-15T12:21:20+5:30
Coronavirus : याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : नायर रुग्णालयात मंगळवारी रात्री 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून याविषयी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीसांनी दिली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील कोरोना ग्रस्तांचा आकडा दीड हजारावर गेला आहे. तर आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ५ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या झोपडपट्टीमध्ये एकूण ६० जण कोरोनाचे रुग्ण सापडले असून यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai: 10 more staff of a hospital have tested positive for #COVID19. They were in quarantine after 3 patients admitted there had tested positive. A total of 35 staff of the hospital have tested positive for the Coronavirus till now. They are being treated at the hospital itself
— ANI (@ANI) April 15, 2020
याच दरम्यान मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलचे आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना ३ कोरोना रुग्णांपासून लागण झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे एकूण ३५ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु करण्यात आले आहेत.
5 new #Coronavirus positive cases reported in Dharavi. The total number of positive cases in the area have now risen to 60 (including 7 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Mumbaipic.twitter.com/2gWQs3HhA0
— ANI (@ANI) April 15, 2020