Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:27 PM2020-05-09T19:27:29+5:302020-05-09T19:31:25+5:30

Coronavirus : त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

Coronavirus: Shocking! A 60-year-old patient with coronavirus committed suicide by strangulation pda | Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

Next
ठळक मुद्दे६० वर्षीय पुरुषाने हॉस्पिटलच्या 9 व्या मजल्यावरील टेरेसच्या लोखंडी अँगलला पायजमा बांधून पायजम्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.

मुंबई - अंधेरी येथील मरोळ परिसरातील सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना झाल्याने दाखल झालेल्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रुग्णाचे वय ६० वर्षीय असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण म्हणून दाखल असलेले ६० वर्षीय पुरुषाने हॉस्पिटलच्या 9 व्या मजल्यावरील टेरेसच्या लोखंडी अँगलला पायजमा बांधून पायजम्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.

ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

 

Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत

 

काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच 

Web Title: Coronavirus: Shocking! A 60-year-old patient with coronavirus committed suicide by strangulation pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.