Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:17 PM2020-06-15T17:17:15+5:302020-06-15T17:19:53+5:30
Coronavirus : त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्याला हैदराबादच्या गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले.
हैदराबाद - देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण त्यादरम्यान हैदराबादहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलगा गांधी रुग्णालयामधून बेपत्ता झाल्याची तक्रार एका कुटुंबानं संबंधित पोलिस ठाण्यात दिली आहे. तो एक कोरोना संभाव्य रुग्ण होता आणि तो पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. हैदराबादमध्ये ३९ वर्षीय नरेंद्र सिंहला २९ मे रोजी कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागली, त्यानंतर त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्याला हैदराबादच्या गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले.
नरेंद्र यांचे भाऊ मुकेश यांच्या म्हणण्यानुसार, ३० मे रोजी आम्ही त्यांच्याशी शेवटच्या वेळी बोललो. त्यांनी गांधी रुग्णालयात असल्याची माहिती दिली होती. पण नंतर त्याचा फोन बंद लागू लागला, त्यानंतर त्यांची चिंता वाढू लागली. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...