CoronaVirus संतापजनक! महिला डॉक्टरवर जमातच्या रुग्णाकडून अश्लिल शेरेबाजी; डॉक्टरांना धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:57 PM2020-04-15T12:57:25+5:302020-04-15T12:58:27+5:30

दिल्लीच्या लोकनारायण जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये एका २५ वर्षींय जमातचा तरुण उपचार घेत होता. त्याला कोरोना झालेला आहे.

CoronaVirus: tabligi jamat patient assaulted women doctor LNJP Delhi hrb | CoronaVirus संतापजनक! महिला डॉक्टरवर जमातच्या रुग्णाकडून अश्लिल शेरेबाजी; डॉक्टरांना धमकावले

CoronaVirus संतापजनक! महिला डॉक्टरवर जमातच्या रुग्णाकडून अश्लिल शेरेबाजी; डॉक्टरांना धमकावले

Next

नवी दिल्ली : तबलीगी जमातमुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमालीचा वाढला आहे. त्यातच या जमातचे लोक डॉक्टरांसोबत घाणेरडेपणाने वागत आहेत. काही दिवसांपूर्वी अश्लिल वर्तन करण्यात आले होते. आता दिल्लीमध्ये एका जमातच्या तरुणाने महिला डॉक्टरचीच छेड काढली आहे. 


दिल्लीच्या लोकनारायण जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये एका २५ वर्षींय जमातचा तरुण उपचार घेत होता. त्याला कोरोना झालेला आहे. वार्ड 5ए मध्ये उपस्थित असलेल्या महिला डॉक्टरकडे पाहून अश्लिल बोलायला लागला. जेव्हा तेथे उपस्थित अन्य डॉक्टर, वॉर्ड बॉयनी बचावासाठी जाब विचारला तेव्हा तेथे अन्य जमातच्या लोकांनी गर्दी करत तणाव निर्माण केला. यामुळे डॉक्टरांना एका खोलीमध्ये लपण्याची वेळ आली. धक्कादायक म्हणजे या खोलीचा दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न जमातीच्या रुग्णांकडून करण्यात आला. 


जमातीच्या रुग्णांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरांनी LNJP च्या मेडिकल डायरेक्‍टरकडे तक्रार केली आहे. यानुसार रुग्णाने महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ केली आणि अश्लिल शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. जेव्हा सोबतच्या डॉक्टरांनी विरोध केला तेव्हा वॉर्डमधील अन्य रुग्ण एकत्र झाले आणि डॉक्टरांना धमकवायला लागले. यावेळी डॉक्टरांना मुख्यमंत्री कार्यालय आणि सुरक्षा रक्षकांनी कोणतीही मदत केली नाही. 


यावर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्‍येंद्र जैन यांनी सांगितले की, हे हल्ल्याचे प्रकरण नाही, तर विनयभंगाचे आहे. याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. उपचारानंतर आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. हॉस्पिटलमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 

Web Title: CoronaVirus: tabligi jamat patient assaulted women doctor LNJP Delhi hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.