Coronavirus : मास्क न लावल्याने आक्षेप घेणाऱ्याच्या घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:33 IST2020-05-04T14:24:05+5:302020-05-04T14:33:05+5:30
Coronavirus : त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Coronavirus : मास्क न लावल्याने आक्षेप घेणाऱ्याच्या घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मास्क लावून आक्षेप घेत एखाद्या व्यक्तीला खूपच महागात पडले. त्याच्यावर तलवार व चाकूने हल्ला करण्यात आला. त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्रकरण मुंबईतील टिळक नगर पोलिस ठाण्याचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काही लोक मास्क न लावता आणि सामाजिक अंतर न बाळगता भाजी खरेदी करीत होते. यावर नवनीत राणा नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेतला. यानंतर नियम मोडणाऱ्या लोकांनी भांडण सुरू केले.
यानंतर रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास काही लोक हातात तलवार व चाकू घेऊन नवनीत राणा यांच्या घरी पोहोचले. नवनीत घरी नसला तरी या लोकांनी नवनीतच्या दोन भावांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल.