पत्नी माहेरी गेलेली असताना मनपा कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:40 IST2021-07-28T21:39:37+5:302021-07-28T21:40:32+5:30
Corporation employee commits suicide : योगेश हा मनपाचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता.याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.

पत्नी माहेरी गेलेली असताना मनपा कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या
जळगाव : पत्नी माहेरी गेलेली असताना योगेश गुलाब गायकवाड (वय ३२,रा.खंडेराव नगर) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खंडेराव नगरातील रेल्वेपुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, योगेश याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. योगेश हा मनपाचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता.याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.