लाचखोर पोलीस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:54 PM2021-05-26T13:54:47+5:302021-05-26T13:57:10+5:30
ACB arrested Police Havaldar : मंगळवारी रात्री सुमारे 10 नंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील पडलेल्या रिकाम्या खोलीत 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे( वय 50) यास रंगेहाथ पकडण्यात आले.
दोंडाईचा: गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल न करता या गुन्ह्याची ब वर्गात समरी पाठवावी,या मोबदल्यात अठरा हजाराची लाच मागणे दोडाईचातील पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडले. दोडाईचातील लाचखोर विजय मोरे हवालदाराला नाशिकच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्या विरोधात दोडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
रामी येथील तक्रार धारक योगेश संतोष कोळी व त्याचा नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल न करता ब वर्गात समरी पाठवावी, या साठी 20 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी हवालदार विजय मोरे यांनी केली होती.तडजोडी नंतर 18 हजार रुपये देण्याचे ठरले.तडजोडी नंतर 18 हजार रुपयाची लाच मागत असल्याची तक्रार नाशिकचालाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे करण्यात आली.त्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टीमने सापळा रचला.
मंगळवारी रात्री सुमारे 10 नंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील पडलेल्या रिकाम्या खोलीत 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे( वय 50) यास रंगेहाथ पकडण्यात आले.
जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकारhttps://t.co/BBV76perCt
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
या सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप-अधीक्षक विभाग विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील, पोलीस हवलदार दिपक कुशारे,सचीन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर,प्रकाश डोंगरे आदींनी रंगेहाथ संशयित आरोपीस पकडले.दोंडाईचा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.