EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:27 PM2020-08-15T12:27:02+5:302020-08-15T12:27:24+5:30
नोएडातील एका खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून थकीत 74 लाख रुपयांचा टॅक्स सेटलमेंट करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची लाच मागितली होती.
गाझियाबाद : सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने गाझियाबादमधील EPFO कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना 8 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. गुरुवारी नोएडा सेक्टर 24 मधील कार्यालयातून अधिकारी नरेंद्र कुमार आणि ब्रजेश रंजन झा यांना ताब्यात घेण्यात आले.
नोएडातील एका खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून थकीत 74 लाख रुपयांचा टॅक्स सेटलमेंट करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची लाच मागितली होती. चर्चेमध्ये ही रक्कम 8 लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने याची तक्रार भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे केली. यानुसार सीबीआयने अकाऊंट ऑफिसर आणि ईपीएफओच्या असिस्टंट कमिश्नरविरोधात गुन्हा दाखल केला.
यानंतर सापळा रचून सीबीआयने अकाऊंट ऑफिसर आणि त्याला मदत करणाऱ्या एनफोर्समेंट ऑफिसरला 8 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर लगेचच सीबीआयने ईपीएफओ आणि दोघांच्या घरी छापे टाकले.
अटक केलेल्या नरेंद्र कुमार आणि ब्रजेश झा याला सीबीआय टीमने गाझियाबादच्या सीबीआय न्यायालयामसमोर हजर केले. सीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश अमितवीर सिंह यांनी दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ईपीएफओ कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत
Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा
आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल