पोलिसानेच घडविली कापूस व्यापाऱ्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:28 PM2021-11-30T14:28:40+5:302021-11-30T14:29:14+5:30
Crime News: जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे.
जळगाव : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यात आणखी आरोपी वाढू शकतात, असेही डॉ.मुंढे म्हणाले. कापूस व्यापारी
स्वप्नील रत्नाकर शिंपी (३०, रा.फरकांडे, ता.एरंडोल) याची शुक्रवारी रात्री पाळधी येथे महामार्गावर साई मंदिराजवळ हत्या झाली होती.
सीसीटीव्ही फुटेज व पोलीस अधीक्षकांनाच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी वेगवेगळ्या
पथकांना घेऊन रात्रीच
धरपकड केली.