अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 09:12 PM2021-07-04T21:12:04+5:302021-07-04T21:13:21+5:30

Vikas Dubey Encounter : दुसरीकडे विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे त्याचा मृत्यू होऊनही सापडलेले नाही. 

Could not yet become husband's death certificate; wife richa dubey demanded euthanasia to up cm yogi adityanath | अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

Next
ठळक मुद्देपोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र अद्याप बनलेले नाही. विकासची पत्नी रिचा हिने मृत्यूचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महापालिकेच्या अनेक येरझाऱ्या मारल्या आहेत

कानपूर - जरी बिकरू प्रकरणात एक वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु या प्रकरणाशी संबंधित काही बाबी अजूनही प्रलंबित आहेत. ज्यामध्ये विकास विरुद्ध असलेला खटला आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. विकासबरोबरच पोलिसांना या प्रकरणात दाम्पत्याविरूद्ध ठोस पुरावे गोळा करता आले नाही. या संदर्भात पीडितेच्या कुटूंबाकडे कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. दुसरीकडे विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे त्याचा मृत्यू होऊनही सापडलेले नाही. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मालमत्तेच्या वादामुळे कोठवाली येथे भाडेकरू महेश दीक्षित, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला विकास दुबे जो चकमकीत ठार झालेला यांच्या विरोधात स्वरूप नगर निवासी वृद्ध कमला देवी यांनी गुन्हा दाखल केला होता. असा आरोप केला जात आहे की, विकास दुबे आणि भाडेकरूंनी मिळून 24 सप्टेंबर 2007 रोजी बनावट रजिस्ट्री तयार करून मालमत्तेच्या पुढील भागावर कब्जा केला होता. यामध्ये पती शत्रुघ्नलाल यांना एक विक्रेता म्हणून दाखविले होते. त्या घटनेपासून पतीही बेपत्ता आहे आणि त्याचा शोधही लागला नाही. विकास दुबेने तिच्या पतीला गायब केले असावे असा तिला संशय आहे. विकास दुबे जिवंत असल्याने कमला देवी भागुन पोलिसात या घटनेची माहिती देऊ शकली नाही. कोतवाली प्रभारी रामकुमार गुप्ता यांनी सांगितले की, करारात स्वाक्षर्‍या महिलेच्या पतीच्या नावे आहेत. त्यांच्या स्वाक्षरीसाठी मूळ स्वाक्षर्‍याचे नमुने मागविले गेले आहेत, जे अद्याप प्राप्त झाले नाहीत. पीडितेच्या कुटूंबाला बँकेच्या जुन्या पासबुकचा नमुना आणि इतर कोणत्याही ठिकाणी शोधण्यासाठी सांगितले गेले आहे, जेणेकरून फॉरेन्सिक तपासणी करता येईल.

 

पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र अद्याप बनलेले नाही. विकासची पत्नी रिचा हिने मृत्यूचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महापालिकेच्या अनेक येरझाऱ्या मारल्या आहेत, पण तिला काही मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही. वास्तविक पोस्टमार्टम अहवालात विकास दुबे याच्या वडिलांचे नाव रामकुमार ऐवजी राजकुमार दुबे आहे, यामुळे मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकले नाही. आता पोस्टमॉर्टम अहवालात नाव सुधारित करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला यशही मिळत नाही. यामुळेच आता रिचा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. 

 

Web Title: Could not yet become husband's death certificate; wife richa dubey demanded euthanasia to up cm yogi adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.